ठाण्यातल्या शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेतले दोषी अधिकारी पुन्हा सेवेत

February 21, 2014 9:23 AM0 commentsViews: 246

Shilphata21 फेब्रुवारी :  शीळ येथील आदर्श इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या 74 जणांच्या मृत्यूला आणि अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरण्यात आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. या संदर्भातील ठराव गुरवारी झालेल्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आली आहे.

4 एप्रिल 2013 रोजी ही दुर्घटना घडली होती. येथील इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दुर्घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिपक चव्हाण,श्रीकांत सरमोकादम, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे,श्याम थोरबोले,कार्यकारी अभियंता सुभाष रावळ ,उपअभियंता रमेश इनामदार ,वरिष्ठ लिपीक किसन मडके, लीपिक सुभाष वाघमारे व चालक रामदास बुरूड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या सर्वांना तुरूंगात टाकले होते.

यापैकी सरमोकादम ,थोरबोले,बुरूड यांना नुकताच जामीन मंजूर झालाय महापालिकेने या सर्वांना तात्काळ निलंबित केले होत. पण सर्वच अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचं काम सर्वपक्षीय नगरसेवक करताना दिसत आहे.

close