भाजप आणि काँग्रेस मुकेश अंबानींच्या खिशात- केजरीवाल

February 21, 2014 2:07 PM0 commentsViews: 670

Kejri web21 फेब्रुवारी : दिल्लीत सत्तात्याग केल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल मैदानात उतरले आहे. केजरीवाल यांनी आता लोकसभेच्या दृष्टीने पावलं टाकतं थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष मुकेश अंबानी यांनी आपल्या खिशात टाकले, असा हल्ला अरविंद केजरीवाल यांनी केलाय. केजरीवाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मोदी, राहुल गांधी आणि अंबानी यांच्यावर चांगलीच टीका केली.

गॅसच्या दराबाबत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी शांत का आहेत ? असा सवाल विचारत नरेंद्र मोदींनी गॅस संदर्भातल्या घोटाळ्यांबाबत आपलं मौन सोडावं असं पत्र केजरीवाल यांनी मोदींना लिहीलं आहे. याशिवाय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही केजरीवाल पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या देशातील विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्याच्या 10 कोटी प्रती देशातील जनतेत वितरीत करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

तसंच नरेंद्र मोदींनी अंबानींचा फायदा मिळवून दिला आणि आता अंबानी त्याचा मोबदला मोदींना देत आहे असा आरोपही केजरीवालांनी केलाय. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांना पैसा, हेलिकॉप्टर कोण पुरवतं अशी जहरी टीकाही केजरीवाल यांनी केलीये.

close