महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी ‘आप’मध्ये

February 21, 2014 5:26 PM0 commentsViews: 923

rajarammohan gandhi21 फेब्रुवारी : महात्मा गांधींचे नातू आणि ज्येष्ठ लेखक विचारवंत राजमोहन गांधी यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. राजमोहन गांधी यांनी निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज कोणताही राजकीय पक्ष सक्षम नाही. पण काँग्रेस पक्ष हा सुरूवातील सर्व सामान्य जनतेचा पक्ष होता. पण आता काँग्रेस हा खास लोकांचा पक्ष झाला आहे. तर भाजप हा श्रीमंत लोकांचा पक्ष आहे त्यामुळे आम आदमी पक्ष हा खर्‍या अर्थाने ‘आम आदमी’चा पक्ष आहे. त्यामुळे आपण प्रवेश केला असं स्पष्टीकरण राजमोहन गांधी यांनी दिलं

. याआधीही राजमोहन गांधी यांचे भाऊ आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना आम आदमी पार्टीत नरेंद्र मोदींच्या विरोधात उभं करणार असल्याची चर्चा होती. राजमोहन गांधी यांनी महात्मा गांधींवर मोहनदास हे चरित्र लिहिलंय. तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरचं त्यांचं ‘सरदार’ हे चरित्र ही गाजलंय.

close