दहशतवादी कसाबच्या खटल्याच्या सुनवाणीस प्रारंभ

March 9, 2009 7:43 AM0 commentsViews:

9 मार्च, मुंबई मुंबई हल्ल्यातला एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्याची आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. मुंबई हल्ल्याबाबत 11 हजार पानांचं आरोपपत्र मुंबई पोलिसांनी दाखल केलंय. कसाबच्या सुरक्षेसाठी आर्थर रोड जेलमध्ये स्पेशल कोर्ट बनवण्यात आलंय. त्यामुळे कसाबवरचा हा खटला आर्थर रोड जेलमध्ये चालणार आहे. कसाबला जेलमधल्या अंडा सेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलंय. कसाबच्या जीवाला धोका असल्याचा इशारा रॉ आणि आयबीनं दिलाय. त्यामुळे मुंबई पोलिस सतर्क आहेत. कसाबच्या सुरक्षेसाठी ऑर्थर रोड जेलमधल्या इतर कैद्यांना दुसरीकडं हलवण्यात आल्याचं समजतंय.

close