डॉ.तात्याराव लहानेंच्या अटकेला स्थगिती

February 21, 2014 8:02 PM2 commentsViews: 1210

lahane21 फेब्रुवारी : मुंबईतील जे.जे.रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने अडचणीत आले आहेत. जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे डॉ. लहाने विरुद्ध कामगार असा वाद सध्या जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये पेटलाय.

डॉ लहाने यांना 25 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नाहीये. लहानेंच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी 25 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार लहानेंना अटक करता येणार नसली तरी त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत जे जे रुग्णालयात जायला मनाई करण्यात आलीय.

जे जे रुग्णालयातल्या बदली कामगारानं डॉ. लहानेंवर आरोप केले आहेत. याबाबत युनियन आणि कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, वेगवेगळी मतं पुढे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात डॉ. तात्याराव लहानेंना गोवलं तर जात नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

  • suresh p. patil

    tatyarao lahanena mudhamhun hya prkarnat goval jateya …sarkarne hya prakarnat laxa ghlun tyana hyaa sankatatun baher kadhave…ek dev mansavar sankat aahe………..

  • rohanavs .

    tatyarao Lahane kharach ek dev manu aahe..

close