गिरणी कामगार जिंकले

February 21, 2014 10:11 PM0 commentsViews: 127

21 फेब्रुवारी : हक्काच्या घरांसाठी गेली अनेक वर्षं संघर्ष करणार्‍या गिरणी कामगारांच्या लढ्याला यश आलंय. एमएमआरडीएची 50 टक्के घरं गिरणी कामगारांना देण्याबाबत लवकरच जीआर निघणार आहे. या जीआरवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सही केलीय. गिरणी कामगारांच्या लढ्यातला हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. तब्बल 10 वर्षानंतर गिरणी कामगारांच्या घराची मागणी खर्‍या अर्थाने पूर्ण झाली असं म्हणता येईल.

close