अंगणवाडीताई पुन्हा रस्त्यावर

February 21, 2014 10:16 PM0 commentsViews: 83

21 फेब्रुवारी : राज्यात अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं ते पाळलं नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आज (शुक्रवारी) रस्त्यावर उतरल्या. कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरीतल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परीषदेवर धडक मोर्चा नेला. पेन्शनची मागणी मान्य झाली असली तरी मानधन वाढीच्या बाबतीत जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोेलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तर रत्नागिरीमधल्या अंगणवाडी सेविकाही रस्त्यावर उतरल्या. रत्नागिरीतल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परीषदेवर धडक मोर्चा नेलाय. पेन्शनची मागणी मान्य झाली असली तरी मानधन वाढीच्या बाबतीत जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोेलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. आमचं म्हणणं सरकारला ऐकून घ्यावंच लागेल अशा घोषणा देत या सेविकांनी रत्नागिरी जिल्हा परीषदेचा परीसर दणाणून सोडला. अंगणवाड्या मात्र बंद करणार नाही असंही या सेविकांनी सांगितलंय.

close