मुंबई हल्ल्याचे धागेदोरे भारतासह इतर देशांमध्ये : इंटरपोलची शक्यता

March 9, 2009 7:47 AM0 commentsViews: 2

9 मार्चमुंबई हल्ल्याचे धागेदोरे भारतासह इतर देशांमध्ये पसरले असल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याची री आता इंटरपोलनंही ओढली आहे. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांचे धागेदोरे सात देशांमध्ये असण्याची शक्यता इंटरपोलचे सरचिटणीस रोनाल्ड नोबल यांनी व्यक्त केलीये. या सात देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केलाय. ' त्या सात देशांशी पाकिस्ताननं संपर्क साधलाय. हल्ल्याचे धागेदोरे इतर देशांमध्येही आहेत का याची आम्ही चाचपणी करत आहोत. पाकिस्तानकडून मिळालेली माहिती आम्ही आमच्या 187 सदस्य देशांना पाठवलीय, ' अशी माहिती सेक्रेटरी रोनाल्ड नोबेल यांनी दिली आहे. भारतानं या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानला सहकार्य करावं अशी मागणीही त्यांनी केलीये. भारतानं या हल्ल्यातील अतिरेक्यांचे डीएनए नमुने पाकिस्तान आणि इंटरपोलला द्यावे, त्यामुळे ग्लोबल डेटाबेसमधून या डीएनए नमुन्यांविषयी तपास करता येईल असंही त्यांनी म्हटलंय. मुंबई हल्ल्याचा तपास पाकिस्तान व्यवस्थितपणं करत असल्याची स्तुतीही रोनाल्ड रोबन यांनी केलीय. आणि भारताला मात्र दोष दिलाय.

close