‘गोदापार्क’च्या निमित्ताने राज-गडकरी एकाच व्यासपीठावर

February 22, 2014 3:23 PM0 commentsViews: 1166

raj gadkari22 फेब्रुवारी : नाशिकमध्ये गोदापार्कच्या निमित्ताने भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले. नाशिक महापालिका आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये गोदापार्कचं नूतनीकरण करण्यात येतंय.

याचं भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या नुतनीकरणासाठी रिलायन्स फाऊंडेशन 90 कोटी रुपये खर्च करणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. नितीन गडकरी जर नसते तर मुंबई-पुणे हायवे होऊ शकला नसता अशा शब्दात राज यांनी गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. तर गडकरींनीही आपल्या भाषणात राज ठाकरेंची स्तुती केली.

गोदापार्क राजकीय पक्षांच्या पलीकडे आहे. नदीकाठचा प्रकल्प कसा असावा याचं आदर्श उदाहरण गोदापार्क ठरेल, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलंय. स्थानिकांना भूमिपूजनाचा मान देऊन विकासकामं करणारी व्यक्ती ही प्रगतीचा विचार करणारी असते, अशी पुष्टी जोडत गडकरींनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. गोदावरी नदीच्या किनारी 8 किलोमीटरच्या पट्‌ट्यात गोदापार्क विकसित होणार आहे. हिरवळ, जॉगिंग ट्रॅक आणि ऍम्युझमेंट पार्क उभारण्याचा रिलायन्स आणि नाशिक महापालिकेचा मानस आहे.

close