हुकूमशाही प्रवृत्तीच्या हातात सत्ता नको -पवार

February 22, 2014 3:48 PM0 commentsViews: 1243

pawar modi23 फेब्रुवारी : माझ्या हातात सत्ता द्या, आणि आम्ही जे म्हणून ते योग्य असून लोकांनी त्या मार्गावर चालावं असं म्हणणं म्हणजे हुकूमशाही आहे असं म्हणणार्‍यांना राजकारणात स्थान नाही, अशा लोकांना जनता स्वीकारणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केलीय.

तसंच शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री गुजरातच्या विकासाचा दावा करतात आणि माध्यमांचीही त्यांना साथ आहे. विकास म्हणजे सगळ्यात गरीब असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या चेहर्‍यावर हसू फुलवणं, मात्र त्याकडं मोदींचं लक्ष नाही असा टोलाही पवारांनी लगावला.

गुजरातचा विकास जसा आम्ही पाहिलाय, तसंच तिथं झालेलं हत्याकांडही आम्ही पाहिलेलं आहे. मात्र जुन्या गोष्टी आम्हाला उगाळायच्या नाहीत, असंही पवार म्हणाले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पवार बोलत होते.

close