भाजपमुळेच भ्रष्टाचारविरोधी विधेयक रखडले -राहुल गांधी

February 22, 2014 2:02 PM1 commentViews: 223

rahul22 फेब्रुवारी : पंधराव्या लोकसभेचं कामकाज काल संपलं. संसदेच्या आतलं राजकारण आतापर्यंत आपण पाहिलं होतं. पण निवडणुकाजवळ आल्यानं हे राजकारण आता संसदेच्याबाहेर पाहायला मिळतंय. भ्रष्टाचारविरोधी विधेयक संमत न होण्याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

आता एका अध्यादेशाच्या माध्यमातून हा कायदा आणू, असे संकेतही राहुल गांधी यांनी दिले आहेत. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर भाजपनंही काँग्रेसवर पलटवार केलाय कुठलंही विधेयक मंजूर करुन घेताना, त्याला सर्वानुमते संमत करुन घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं कधीच केला नाही, असा प्रतिआरोप भाजपनं राहुल गांधींवर केलाय.

तसंच मनमोहन सिंग यांच्या सरकारनं भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडलेत, काँग्रेसच्या खासदारांनीच संसदेचा किती वेळ वाया घालवला याची यादीच मी माध्यमांना देईन असं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. संसदेच्या अधिवेशाचा वेळ वाया गेल्याचं वाईट वाटतं, असंही सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.

  • Vikram

    It seems congress is thanking BJP, as bill could not be passed and got a license to do scams :D

close