शिवसैनिकांना हात लावला तर याद राखा -आदित्य ठाकरे

February 22, 2014 4:23 PM4 commentsViews: 9166

aaditya22 फेब्रुवारी : मला एकदा धमकी देणार्‍यांना मी शंभरवेळा माफ करतो, पण शिवसैनिकांना जर हात लावला तर शिवसैनिक काय करता मग ते बघाच असं सडेतोड उत्तर शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांना दिलं.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना आणि नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. यावेळी शिवसैनिक आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी खुद्ध नितेश राणेही हजर होते. यावेळी राणे यांनी आदित्य ठाकरेंना सिंधुदुर्गात पाय ठेऊ देणार नाही अशी गर्जना करत सेनेला आव्हान दिलं होतं.

नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारत आदित्य ठाकरे आज (शनिवारी) सिंधुदुर्गात दाखल झाले. वेंगुर्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांसह रॅलीही काढली. आपल्या कारच्या टपावर बसून आदित्य ठाकरे रॅलीतून सर्वांना अभिवादन करत होते. “अरे आवाज कुणाचा.. शिवसेनेचा” अशा घोषणांनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

या रॅलीच्या नंतर शिवसैनिकांनी संवाद साधत असताना आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंनी इशारा दिला. मला धमकी दिली तर मी तुम्हाला शंभर वेळा माफ करतो, पण जर का शिवसैनिकाला हात जरी लागला तर शिवसैनिक काय करतील ते बघाच अशा इशाराच आदित्य ठाकरेंनी दिला.एकंदरीतच नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा सामना आजपर्यंत पाहण्यास मिळाला पण आता या निमित्ताने दोन्ही पक्षांचे युवराज एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

 • umesh jamsandekar

  वाघाचा बच्चा आहे गरजणारच.

 • PRADEEEP CHAVAN

  ek no

 • Randhir Surve

  …..

 • Vishal Rajadhyaksha

  ghanta vaghacha bachcha !

close