औरंगाबादमध्ये काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

February 22, 2014 4:59 PM0 commentsViews: 1094

abad news23 फेब्रुवारी : अमेरिकेच्या धरतीवर भारतातही लोकांनी पक्षाचा उमेदवार निवडावा, या राहुल गांधींच्या योजनेमुळे औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबादच्या काँग्रेस भवनात नितीन पाटील आणि उत्तमसिंग पवार यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली.

उमेदवारांची भावना जाणून घेण्यासाठी पक्ष निरिक्षक मुजफ्फर हुसेन आणि धोंडीराम राठोड भवनात दाखल झाले होते. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. दोन्ही समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत उत्तमसिंग पवार यांचा एक समर्थक जखमी झाला.

या हाणामारीत सळई, चाकूचा वापरही केला गेला असं जखमी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जखमी कार्यकर्त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लोकसभेच्या उमेदवारीसाठी दोन दिवसांपासून पक्ष निरिक्षक मुजफ्फर हुसेन आणि धोंडीराम राठोड हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठीच्या भावना जाणून घेण्यासाठी आले आहेत. पण नितीन पाटील यांचे समर्थक गोंधळ घालण्याच्या पवित्र्यात होते. आज पुन्हा नितीन पाटील यांच्या समर्थकांनी पक्षनिरीक्षकांसमोर उत्तमसिंग पवार यांच्या समर्थकांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर याचं रुपांतर मारामारीत झालं.

close