‘आप’च्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीने जाळला केजरीवालांचा पुतळा

February 22, 2014 5:16 PM1 commentViews: 954

aap vs ncp22 फेब्रुवारी : राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टीच्या आरोप-प्रत्यारोपाची लढाई आता रस्त्यावर आलीय. मुंबईतील चकाला भागातील आम आदमी पार्टीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

यावेळी कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा पुतळा जाळला. त्यानंतर त्यांनी रास्ता रोकोही केला. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होतं. नंतर पोलिसांनी मातेले यांच्यासह 30 ते 35 कार्यकत्यांना ताब्यात घेतलंय. या घटनेनंतर राष्ट्रवादीनं मातेले यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

या प्रकरणी गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांची हकालपट्टी का करु नये अशी विचारणा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. तर आपच्या ऑफिसला पोलीस संरक्षण असूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई का केली नाही, असा सवाल आपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, आपल्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे संतापलेले आपचे नेते मयांक गांधी आपल्या समर्थकासह राष्ट्रवादीच्या ऑफिससमोर निदर्शनं करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.

  • Suraj Shah

    ANARCHY

close