पाकिस्तानात अस्थिरता

March 10, 2009 5:44 AM0 commentsViews: 2

10 मार्च पाकिस्तानची वाटचाल पुन्हा एकदा लष्करी राजवटीच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतंय. सध्याच्या अराजकतेच्या स्थितीत पाकिस्तान लष्कर देशाची सूत्र हाती घेईल, अशी चर्चा सुरू आहे. देश सांभाळता येत नसेल तर सत्ता सोडा, असा परखड इशारा लष्करप्रमुख अश्फाक कयानी यांनी अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना दिलाय. त्यामुळे पाकमध्ये लष्कर बंड करून पुन्हा सैनिकी शासन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कयानी हे अमेरिकेच्या सल्ल्यानुसार काम करत असल्याचा आरोप होतोय. दरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे 16 मार्च रोजी विरोधी पक्ष आणि वकिलांच्या मदतीनं सरकार विरोधात मोर्चा काढणार आहेत. त्यातच माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी संधी मिळाल्यास पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचं म्हटलंय.

close