शिवसेनेचे खासदार दुधगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर?

February 22, 2014 9:37 PM0 commentsViews: 1465

ganesh dudhgaonkar22 फेब्रुवारी : आधी कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे नंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आता परभणीचे सेनेचे खासदार गणेश दुधगावकर हे शिवसेनेचे तिसरे खासदार आघाडीच्या वाटेवर आहेत.

दुधगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेटही घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. खरं तर गेल्या वर्षभरापासून गणेश दुधगावकर यांचा शिवसेनेशी संपर्क तुटलाय. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होतच होती, पण आज (शनिवारी) दुधगावकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या चर्चेत तथ्य असल्याचं दाखवून दिलंय.

दरम्यान, येत्या सोमवारी श्रीरामपूरच्या काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करत आहेत. तसेच येत्या काळात शिवसेनेचा आणखी एखाद दुसरा खासदार काँग्रेच्या गळाला लागेल अशी चर्चा आहे.

close