राष्ट्रवादीच्या रखडलेल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

February 23, 2014 1:52 PM0 commentsViews: 2456

10nlook123 फेब्रुवारी :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी राष्ट्रवादीनं जवळपास निश्चित केली असली तरीसुद्धा काही मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारांशी बोलून गटबाजी टाळण्याचा प्रयत्न खुद्द शरद पवारांनी चालवला आहे.

काल बुलडाणा आणि माढा मतदारसंघातल्या तर आज सकाळपासून सातारा, नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारांशी शरद पवार चर्चा करत आहेत.

सध्या देवगिरी बंगल्यावर पवारांची बैठक सुरु आहे तर दुपारी दीड वाजता शरद पवार पक्षाच्या निवडक वरिष्ठ नेत्यांबरोबर सर्व 22 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी अंतिम करणार आहेत. त्यात काँग्रेसबरोबरच्या अदलाबदलीच्या जागांवरही चर्चा होणार आहे.

close