दीड वर्षाचा चिमुलका अडकला बोअरवेलमध्ये

February 23, 2014 4:54 PM0 commentsViews: 381

borewell23 फेब्रुवारी :   शिरुरजवळील टाकळी हाजी गावातील दिड वर्षाचा मुलगा आज (रविवार) 180 फुट खोल शेतातील बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली.  दुपारी 12.15 च्या सुमारास ही घटना घडली असून, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मुलाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राने शुभमपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोचवले असून, साधारण 20 फूट खाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

close