कॉंग्रेस जनतेच्‍या डोळ्यांत ‘मिर्ची’ टाकण्‍याचे काम करत आहे – नरेंद्र मोदी

February 23, 2014 3:41 PM0 commentsViews: 424

modi23 फेब्रुवारी : पंजाबमधील जगराहो येथे जाहीर सभेला भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी संबोधीत केले. तत्‍पूर्वी पंजाबचे मुख्‍यमंत्री प्रकाश‍सिंग बादल यांनी पगडी आणि तलवार भेट देऊन मोदींचा सत्‍कार केला.

शखांच्या वाहे गुरुंची काढली आठवण
– पंजाबसोबत गुजरातचं विशेष नातं
– पंचप्यारे मधला एकजण गुजरातच्या द्वारकेचा
– शिखांना पूज्य असलेले पंचप्यारे
– देशाला जगाचा गुरु बनवू- मोदी
– गुजरातवर प्रत्येक भारतीयाचा अधिकार
– जगात कुठंही गेलात तरी पंजाबी आणि गुजराती माणसं आढळतातच
– काही जण खोटा प्रचार करत आहेत
– त्यांच्यापासून सावध राहा
– शिरोमणी अकाली दल आणि भाजपाची युती ही पक्की आहे
– हिंदू आणि शिखांच्या एकतेचं प्रतिक म्हणजे ही युती
– काँग्रेसचं ‘फोडा आणि राज्य करा’चं राजकारण
– पंजाबात बादल सरकारनं मात्र काँग्रेसची डाळ शिजू दिली नाही
– पंजाबी खाणं आणि गाणं प्रत्येक भारतीयाला आवडतं
– पंजाब ही शूरवीरांची भूमी
-काँग्रेसला लाला लजपतराय आठवतही नाहीत
– काँग्रेस फक्त एका कुटुंबाची पूजा करण्यात मग्न
– काँग्रेसला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकारच नाही
– भ्रष्टाचाराची एबीसीडी म्हणजे काँग3ेस
– ए फॉर आदर्श, बी फॉर बोफोर्स, सी फॉर कोल घोटाळा
– राजीव गांधींनी सुद्धा मान्य केलेलं 1 रुपया दिला तर 15 पैसे गरिबाला पोहोचतात
– मग मधले सगळे पैसे कुणाच्या खिसात जातात?
– मोदींचा भ्रष्टाचारावर सवाल
– तुम्ही मला पंतप्रधान बनवाल, पण मी देशाचा रखवालदार बनेन
– पंतप्रधान बनून मी देशाचं रक्षण करेन
– देशाच्या तिजोरीचं प्राणपणानं रक्षण करेन
– भ्रष्टाचार होऊ देणार नाही, मोदींचे आश्वासन
– पंजाबच्या बादल सरकारनं ग्रामीण विकासाचं मॉडेल उभारलं
– तीन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं
– देशाच्या आर्थिक विकासासाठी कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्राचा विकास हवा
– मोदींचे लुधियानात वक्तव्य.
– प्रति एकर अन्नधान्याचं उत्पादन वाढायला हवं
– धान्य सडलं तरी चालेल पण गरिबाच्या पोटात काँग्रेस सरकार जाऊ देत नाही
– धान्य कुजवून दारु बनवण्यात यूपीएला रस
– आम्ही एनडीए म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स सोबतच
– नॅशनल अलायन्स फॉर डेव्हलपमेंटही आहोत
– विकासासाठी आम्ही कटिबद्ध
– वन रॅन्क वन पेन्शनचं काम वाजपेयींच्या काळातच झालं असतं
– जर वाजपेयींची सत्ता आली असती तर
– वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारण्यात पंजाबच्या शेतकर्‍यांचं महत्त्वाचं योगदान

close