सत्तेचा माज आणि क्रोध याला राजकारणात जागा नाही- राहुल गांधी

February 23, 2014 5:59 PM1 commentViews: 324
RAHUL IN GUPTKASHI_123 फेब्रुवारी :  सत्तेचा माज आणि क्रोध याला राजकारणात जागा नाही असं म्हणत, राजकारण म्हणजे जनतेचं दु:ख समजणं असतं. काही लोक देशाचे तुकडे कण्याचा प्रयत्न करत आहेत.  आणि यासाठी ते रक्ताचे राजकारण करुन हिंदू – मुस्लिमांमध्ये दंगलही घडवू शकतात अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे.
महिलांचे सबलीकरण झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही, असे मत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. महिलांनी आम्हाला सांगितले 9 सिलिंडरमध्ये घर चालविता येत नाही. आम्ही लगेच महिलांची मागणी पूर्ण केली. आता प्रत्येक कुटुंबाला 12 सिलिंडर मिळणार आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

उत्तराखंडमधल्या पुनर्वसन कार्याचं श्रेय राहुलन लष्कराला दिले. जेव्हा नैसर्गिक संकट कोसळले तेव्हा लष्कराच्या जवानांनी उत्तरखंडमध्ये मोठे कार्य केले.  यावेळी वायुदलाचे एक हेलिकॉफ्टर कोसळले. काही जवानांचा मृत्यू झाला. परंतु, तरीही मदत कार्यात कोणताही अडथळा आला नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

  • aazaad hindustaani

    AAP is the only hope for India.

close