राष्ट्रवादीचा 50-50चा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य

March 10, 2009 2:39 PM0 commentsViews: 4

10 मार्च दिल्लीजागावाटपाबाबत दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक झाली. संरक्षणमंत्री ए.के.ऍण्टोनी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. पण ही बैठकही अनिर्णित राहिली. 2004 मध्ये दोन्ही पक्ष ज्या 27-21 च्या फॉर्म्युल्यावर लढले होते, तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याची भूमिका काँग्रेसने लावून धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनं केलेली 24 जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावली. तसंच राष्ट्रवादीने केलेली उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघाची मागणीही काँग्रेसनं फेटाळून लावली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसंच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. याबैठकीत मित्र पक्षांना जागा सोडण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान दोन्ही काँग्रेसतर्फे चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहचली असून 90 टक्के जागांवर निर्णय झाल्याचं सांगितलं जातं आहे. आता रात्रीच्या आठव्या बैठकीत अंतिम तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

close