भांडूपमध्ये सीएट कंपनीला आग, मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने

February 23, 2014 7:10 PM0 commentsViews: 1124

23 फेब्रुवारी :   मुंबईतील नाहूर येथे सीएट टायर कंपनीला रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीचा फटका मध्य रेल्वेला बसला असून मध्य रेेल्वेवर कल्याण दिशेला जाणा-या धीम्या मार्गावरील वाहतूक विक्रोळी ते मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे ५ ते १० मिनीटे विलंबाने धावत आहेत.

नाहूर पश्चिम येथे सीएट टायर कंपनी असून संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीएट कंपनी रेल्वे रुळापासून जवळ असल्याने मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून वाहूतक वळवली आहे. आगीचे वृत्त समजताच ८ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

close