काँग्रेसही दिग्गजांना रिंगणात उतरवणार

March 10, 2009 3:08 PM0 commentsViews: 6

10 मार्च राज्यात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.त्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणेच वजनदार नेत्यांना रिंगणात उतरवण्याचं काँग्रेस हायकमांडनं ठरवलं आहे. त्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवराज पाटील, नारायण राणे, चंद्रकांत हंडोरे यांची नावं आघाडीवर आहेत. उस्मानाबादहून निवडणूक लढण्यासाठी पक्ष आग्रह करेल, याची खात्री विलासराव देशमुखांना होती, पण आता औरंगाबादहून लोकसभा लढवावी असा आग्रह काँग्रेस हायकमांडकडून होत आहे. तर लिंगायत समाजाचं प्राबल्य असणा-या उस्मानाबादमध्ये शिवराज पाटील यांना रिंगणात उतरावं असं हायकमांडला वाटतंय. सिंधुदुर्गातून मुलाऐवजी स्वत: नारायण राणे यांनीच रिंगणात उतरावं असा आग्रह होतोय. तर समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी ईशान्य मुंबईमधून उभं राहावं अशी शिफारस प्रदेश काँग्रेसनं हायकमांडकडे केली आहे.

close