मुंबईत होणार आयपीएलचा शुभारंभ

March 10, 2009 3:18 PM0 commentsViews: 4

10 मार्च मुंबईआयपीएलचा दुसरा हंगाम ठरल्याप्रमाणे 10 एप्रिलला सुरू होणार असल्याचं आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी मुंबईत जाहीर केलं आहे. मुंबईत डी वाय पाटील स्टेडिअममध्ये हा शुभारंभाचा सोहळा पार पडणार आहे. स्पर्धेचं सविस्तर वेळापत्रक तयार करण्याचं काम मात्र सध्या सुरू आहे आणि काही दिवसातच ते जाहीर करण्यात येईल असं मोदींनी म्हटलं आहे.सध्या पाच राज्यांनी आयपीएल आयोजनाला मान्यता दिली आहे. आणि इतर राज्यांबरोबरही बोलणी शेवटच्या टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सुरक्षेविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, यंदा टीम्सच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आयोजकांनी उचलली आहे आणि टीम्सना केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

close