‘एलबीटी’विरोधात पुण्यातल्या व्यापार्‍यांचा आज बंद

February 24, 2014 9:30 AM0 commentsViews: 227

Image lbt_strike_in_maharashtra44_300x255.jpg24 फेब्रुवारी :  एलबीटीच्या वसुलीसंदर्भात आक्षेप घेत पुण्यातल्या व्यापार्‍यांनी आज एलबीटीविरोधात बंद पुकारला आहे. त्यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांच्या 82 संघटना सहभागी होणार आहेत.

गेल्या वर्षी एलबीटीसंदर्भात झालेल्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. एलबीटीची वसुली ही जाचक पद्धतीने होते, त्यामध्ये समन्वय साधला जात नसल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केलाय. त्याविरोधातच आवाज उठवण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला गेला आहे.
यानंतर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा व्यापारी संघटनेनं दिला आहे.

close