हिमाचलप्रदेशात रॅगिंगमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

March 10, 2009 3:45 PM0 commentsViews: 2

10 मार्च हिमाचलप्रदेशमध्ये रॅगिंगमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमन कचरू असं या 19 वर्षीय दुर्देवी मुलाचं नाव आहे. तो मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. काही सीनिअर्सनी रॅगिंग केल्याची तक्रार अमननं प्राचार्यांना केली होती. याचाच राग येऊन वरच्या वर्गातल्या चार विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अमनच्या पालकांनी केलाय. पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे फरार आहेत. या चौघांनी दारू पिऊन अमनची वारंवार रॅगिंग केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. कॉलेज प्रशासनानं सुरुवातीला अमननं आत्महत्या केल्याचा दावा केला होता, तसंच पोलिसांकडे संपर्क साधण्यासाठी जवळपास 24 तास उशीरही केला. त्यामुळे कॉलेजचे प्राचार्य, हॉस्टेलचे वॉर्डन यांनाही याप्रकरणी सहआरोपी करावं तसंच हे कॉलेजच बंद करावं अशी मागणी अमनच्या वडिलांनी केली आहे.

close