काँग्रेस देणार घोटाळेबाज नेत्यांना मदतीची ‘हात’?

February 24, 2014 5:45 PM2 commentsViews: 1294

chavan and kalmadi24 फेब्रुवारी : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळत आहेत. आदर्श सोसायटी प्रकरणात आरोपी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यातील   सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

पण, ते सिद्ध झालेले नाहीत, असं म्हणत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी या दोन्ही नेत्यांचा बचाव केला. तिकीट मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकारच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्या नावांचा विचार काँग्रेस करतंय, असे संकेत मिळत आहेत.

नारायण सामी म्हणतात, दोन गोष्टी आहेत. आरोप होणं आणि दोषी सिद्ध होणं. जोवर कुणीही दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणता येत नाही. हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मी कुणालाही भ्रष्टाचारी म्हणू शकतो. पण, मला ते सिद्ध करावं लागेल. पुरव्यांशिवाय तुम्ही नरेंद्र मोदींसारखं फक्त हात उंच करून लोकांना खोटं बोलू शकत नाही अशी टीकाही सामी यांनी केली.

अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्यावर कोणते आरोप आहेत ?

अशोक चव्हाण
आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यामध्ये नाव आहे. त्यांच्यावरचे फौजदारी गुन्हे रद्द करा, ही सीबीआयची मागणी गेल्याच महिन्यात विशेष कोर्टानं फेटाळली होती.

सुरेश कलमाडी
कॉमनवेल्थ घोटाळ्यात आरोप आहेत. 2010 मध्ये झालेल्या या गेम्समधल्या अनेक कंत्राटांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याचाही तपास सुरू आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

  • - या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही लोकसभेचं तिकीट देण्याबाबत त्यांच्या नावांचा विचार का होतोय ?
  • - प्रचारांमध्ये भ्रष्टाचारविरोधात भूमिका घेणारी काँग्रेस आपल्या या निर्णयाचं समर्थन कसं करणार ?
  • - निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी जिंकून येण्याची क्षमता हा एकमेव निकष आहे का ?
  • सागर गाटे

    काँग्रेस हात देईल पण मतदार त्यांच तंगड तोडून खाली पाडेल.,,

  • Suraj Shah

    DONT UNDERESTIMATE THE INTELLIGECE OF A VOTER

close