संजयला कोणत्या आधारावर रजा दिली?, केंद्राची विचारणा

February 24, 2014 4:01 PM1 commentViews: 553

 sanjay dutt24 फेब्रुवारी : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला कोणत्या आधारावर वारंवार पॅरोल दिला जातो अशी विचारणा केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे केलीय केलीय. केंद्रीय गृहमंत्र्यालयाने राज्य सरकारला याबाबत नोटीस बजावली आहे.

संजय दत्तला 18 फेब्रुवारी रोजी आणखी 30 दिवसांची सुट्टी देण्यात आलीय. संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेलबाहेर आहे. त्याने तिसर्‍यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता, आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आला असून संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव सुट्टी मंजूर करण्यात आलीय. त्यामुळे 21 मार्चपर्यंत संजय दत्त जेलबाहेरचं असणार आहे.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा संजयने अगोदर भोगली आहे. उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजयची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आलीय पण या शिक्षेत संजय दत्त 8 महिन्यांच्या तुरुंगवासात 4 महिन्यांच्या सुट्टीवरचं आहे. संजयला वारंवार सुट्टी देण्यात आल्यामुळे विरोध होतोय. राज्यभरात जवळपास 800 कैद्दी अजूनही रजेच्या प्रतिक्षेत आहे. पण संजयला वारंवार रजा देण्यात आहे.

 संजय दत्तने आतापर्यंत किती सुट्‌ट्या घेतल्यात ?

  • - 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
  • - 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
  • - 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ
  • - 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी
  • - 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी
  • - 18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ

  • Shrenik Bindage

    कोर्टाने शिक्षा दिली याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आणि असे असेल तर हा देशद्रोह नाही का? संजय दत्त ने जितक्या रझा घेतल्या ते सर्व दिवस मोजून पुढे शिक्षा आणि ठरलेला कालावधी भोगलाच पाहिजे आणि यावर अंमल झाला पाहिजे. सारे बकवास आहे. गरिबाला एक आणि मोठा माणूस म्हणून एक हे कशाचे द्योतक आहे?

close