धनंजय महाडिकांना उमेदवारी का ?, मंडलिकांचा सवाल

February 24, 2014 3:19 PM1 commentViews: 2207

Image img_232252_mandliksot346_240x180.jpg24 फेब्रुवारी : कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नसताना त्यांना शरद पवार यांनी का उमेदवारी दिली असा सवाल कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी विचारला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये आता उमेदवारीवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंडलिक हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य असल्यानं त्यांनी कोल्हापूरवर आपला हक्क सांगितला आहे. मात्र आपल्या गटाची भूमिका ठरवण्यासाठी मंडलिक गटाचा एक मेळावा नुकताच कोल्हापूरमध्ये घेण्यात आला. या मेळाव्यात मंडलिक यांनी महायुतीत सामील व्हावं असा सूर कार्यकर्त्यांनी लावून धरला.

त्यामुळे येत्या 2 दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचं खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केलंय. तर त्यांचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी निवडणूक लढावावी आणि तिही महायुतीमधून असाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसांत मंडलिक गट काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रचं लक्ष लागलंय.

  • Shrenik Bindage

    अहो मग संजय मांडलिक च का? मागच्या वेळेस असेच केले शरद पवारांनी फसवले आणि मी परत निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. मग आता हे काय नवीन? दुसर्या लोकांना पण संधी मिळाली पाहिजे.

close