नवीन पटनायक सरकारनं विश्वासमत ठराव जिंकला

March 11, 2009 9:24 AM0 commentsViews: 1

11 मार्च ओरिसातल्या नवीन पटनायक सरकारनं विश्वासमत ठराव जिंकलाय. जागावाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर भाजपनं सरकारचा पाठिंबा काढला होता. पटनायक यांनी ध्वनीमताने हा ठराव जिंकलाय. भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत बीजेडी सरकारला पाठिंबा दिल्यानं भाजपमध्ये खिंडार पडणार हे स्पष्ट झालंय. तर नवीन पटनायक यांना तीसर्‍या आघाडीत ओढण्यासाठी डावी आघाडीचा प्रयत्न आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ओरिसामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. भाजप आणि बिजू जनता दलाचा काडीमोड झाल्यानंतर भाजपनं पटनायक सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. पण बहुमतासाठी आवश्यक असलेला 74 चा आकडा सहज गाठू असा पटनायक यांना विश्वास होता. 61 आमदारांच्या बीजेडीला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी 13 आमदारांची गरज होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि सीपीआय-सीपीएमच्या प्रत्येकी एका आमदाराने बिजेडीला पाठिंबा दिलाही आहे. बीजेडीची भिस्त आता अपक्ष आमदारांवर होती. आणि काही तासात निकाल बीजेडी सरकारच्या बाजूनं लागला.

close