लालूंना धक्का, 7 आमदारांनी दिला राजीनामा

February 24, 2014 9:44 PM0 commentsViews: 806

lalu overall pkg24 फेब्रुवारी : देशाचं पंतप्रधान व्हायचंय अशी इच्छा लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच बोलून दाखवली होती. पण त्यांच्या स्वप्नांचा चक्काचुर करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील आमदारांनी सुरुंग लावलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये उलथापालथ होताना दिसतेय.

राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला. लालू यांच्या आरजेडीच्या 13 आमदारांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आणि ते संयुक्त जनता दलाच्या मार्गावर असल्याच्या बातम्या सुरुवातीला आल्या. पण नंतर त्यातल्या 6 आमदारांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे लालूंचे सोबती असलेले लोक जन शक्ती पक्षाचे राम विलास पासवान हे भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे.

close