सेनेला धक्के पे धक्का, दुधगावकर लवकरच राष्ट्रवादीत?

February 24, 2014 9:53 PM1 commentViews: 1758

dudhgaonkar 4324 फेब्रुवारी : शिवबंधनाचा धागा तोडून शिर्डीचे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. पण आता सेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे पाठोपाठ आता परभणीचे शिवसेनेचे ऍड. गणेश दुधगावकर हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

दुधगावकर लवकरच पक्षात प्रवेश करतील, असं राष्ट्रवादीनं जाहीरही केलंय. गेल्या वर्षभरापासून दुधगावकर राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. पण त्यांना शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी नाकारली गेल्यानं, त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवलाय. कदाचित राष्ट्रवादीकडून त्यांना लगेच विधानपरिषदेची आमदारकीसुद्धा दिली जाऊ शकते.

तत्पूर्वी औरंगाबादमध्ये दरम्यानच्या काळात झालेल्या शिवसेनेच्या विभागीय बैठकीलासुद्धा गणेश दुधगावकर यांनी दांडी मारली होती. विशेष म्हणजे ही बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. त्याचवेळी दुधगावकर पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचं स्पष्ट झालं होतं.

  • rahulil.com

    ek bhikari.. padansathi gela

close