आता मुंबई ते लोणावळा ‘बुंग’ने !

February 24, 2014 11:04 PM1 commentViews: 2667

24 फेब्रुवारी : देशातली पहिली मोनो रेल सुरू झाली ती मुंबईत, देशातली दुसरी आणि राज्यातली पहिली मेट्रो रेल्वे ती सुद्धा सुरू होतेय मुंबईत. आणि आता मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्रावरून ‘उड्डाण’ही करता येणार आहे. एमटीडीसी आणि मेह एअर या खासगी कंपनीच्या माध्यमातून मुंबईत देशातली पहिली ‘सी प्लेन टूर’ म्हणजेच हवाई मार्गे समुद्र सफर सेवा सुरू करण्यात येणार आहे.

 

4 सिटर आणि 9 सिटरची विमानं प्रवाशांच्या दिमतीला असणार आहे. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात वाढ व्हावी यासाठी हा एक प्रयत्न आहे. या एप्रिल महिन्यापासून ‘सी प्लेन’ सेवा मुंबईतून सुरू केली जाणार आहे. आज मुंबईतल्या पवनहंस येथे शासनातर्फे याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या ‘सी प्लेन’साठी 20 कोटींची गुंतवणूक करण्यात आलीय. दोन टप्प्यात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

 

एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्याला सुरूवात केला जाणार आहे. यात मुंबई ते लोणावळा ऍम्बी-व्हॅली लेक, नाशिक गंगापूर धरण, शिर्डीचं मुळा धरण, लोणावळ्याचं पवना धरण आणि वरस गाव लवासाला फेरी सुरू करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा हा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई ते कोकण असा प्रवास करता येणार आहे. यामध्ये मुंबई ते गणपती पुळे, हरीहरेश्वर, तारकर्लीची खाडी, आणि मुरड जंजिरा पर्यंत हवाई सफर करता येणार आहे. मात्र या हवाई सफरीसाठी किती रुपये मोजावे लागणार हे अजून गुलदस्त्या आहे.

  • Nitin Shirole

    chan

close