हॅमिल्टनच्या मॅचमध्ये पावसाचा खोडा… मॅच थांबली

March 11, 2009 4:54 AM0 commentsViews: 6

11 मार्च, हॅमिल्टन भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या वन डे सीरिजमध्ये पुन्हा एकदा पावसाने रंगाचा बेरंग केला. हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडने पाच विकेटवर 209 रन्स केले असताना पाऊस सुरू झाला आणि नाईलाजाने खेळ थांबवावा लागला. पावसाची एक मोठी सर कोसळलीय. मात्र ग्राऊंड्समननी लगेच कव्हर्स घातल्याने फारसं नुकसान झालं नाही. दहा मिनिटांच्या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. त्यापूर्वी, टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर न्यूझीलंडची सुरुवात तर दणक्यात झाली. पण मिडल ऑर्डर बॅट्समन त्याचा फारसा फायदा उठवू शकले नाहीत.चाळीस ओव्हर्सनंतर टीमने दोनशेचा टप्पा ओलांडलाय. पण त्यांची निम्मी टीम आऊट झालीय. जेसी रायडर आणि ब्रँडन मॅक्युलमने खरंतर टीमला सेंच्युरी पार्टनरशिप करुन दिली होती. पण रायडर 46 रन्सवर आऊट झाल्यावर..मिडल ऑर्डर बॅटिंग कोसळली. रॉस टेलर, गपटिल आणि जेकब ओरम झटपट आऊट झाले. मॅक्युलमही 77 रन्स करुन आऊट झाला. युसुफ पठाण आणि युवराज सिंग यांचा स्पीन मारा आज यशस्वी ठरला.

close