जिंकण्यासाठी भारतासमोर 271 रन्सचं आव्हान

March 11, 2009 5:27 AM0 commentsViews: 1

11 मार्च, हॅमिल्टनभारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टनमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये पावसाने दोनदा व्यत्यय आणल्यावर मॅच प्रत्येकी 47 ओव्हर्सची करण्यात आलीय. आणि जिंकण्यासाठी भारतासमोर 271 रन्सचं आव्हान आहे. न्यूझालंडसाठी जेसी रायडर आणि ब्रँडन मॅक्युलम या ओपनर्सनी सेंच्युरी पार्टनरशिप करुन दिली. आणि त्यावर कळस चढवला तो सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मॅकग्लॅशनने. मॅक्युलमने शानदार हाफ सेंच्युरी करत 77 रन्स केले. रायडर आणि मॅक्युलम आऊट झाल्यावर न्यूझीलंडच्या पुढच्या तीन विकेट पन्नास रन्समध्ये गेल्या..आणि न्यूझीलंडची अवस्था पाच विकेटवर 175 अशी झाली. पण मॅकग्लॅसनने खेळाची सूत्र आपल्याकडे घेतली आणि टीमला अडिचशेचा टप्पा ओलांडून दिला. भारताची बॉलिंग आज सातत्यपूर्ण नव्हती आणि त्याचा फायदा न्यूझीलंडने उचलला.

close