राष्ट्रवादीला धक्का, संजयकाका पाटील भाजपमध्ये

February 25, 2014 6:19 PM0 commentsViews: 2829

sanjay kaka patil25 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे सांगलीचे विधान परिषदेचे आमदार संजयकाका पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

त्यांनी आज (मंगळवारी) विधान परिषद आमदारकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. आणि संध्याकाळी भाजपच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये जाऊन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सांगलीच्या राजकारणात संजय काका पाटील यांचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यांनी या अगोदर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याविरोधात आखाड्यात उतरले होते. यामुळे आबांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने संजय काका पाटलांना आमदारकी देऊ केली होती. पण दोन्ही पाटलांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडलीय.

त्यामुळे संजय काका पाटलांनी भाजपची वाट धरली. डोंबिवलीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे दोन आमदार आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. अखेर मुंडेंनी आपला शब्द खरा ठरवलाय. संजय काकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झाले आहे.

close