असा आहे गॅलेक्सी एस – 5 !

February 25, 2014 8:34 PM1 commentViews: 4183

25 फेब्रुवारी : मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी सॅमसंगने दमदार फिचरसह आपला नवीन गॅलेक्सी एस-5 मोबाईल लाँच केलाय. स्पेनमध्ये बार्सिलोना इथं आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस-5 लाँच केलाय. आजपर्यंत कोणत्याही फोनमध्ये असे फिचर नाही ते एस-5 मध्ये असल्याचा दावा सॅमसंगने केलाय.

गॅलेक्सी एस-5 हा स्क्रीन 5.1 इंचाची आहे. तसंच या फोनमध्ये लेटेस्ट ऍन्ड्राईड आयओएस, किटकॅट 4.4.2, 16 मेगा पिक्सेलचा कॅमेरा, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत मेमरी आहे. त्यासोबतच फिंगरप्रिट सेन्सर आहे. त्यामुळे फोनचा मालकच हा फोन हाताळू शकतो. तसंच हा फोन पाणी, धुळ प्रतिरोधक आहे.

नवीन म्हणजे, या फोन मध्ये ह्रदयाची ठोके मोजता येणारं सेन्सर सुद्धा आहे. ह्रदयाची ठोके मोजणार हा पहिला स्मार्ट फोन ठरलाय. गॅलेक्सी एस -5 हा चार रंगात उपलब्ध असून यामध्ये इलेक्ट्रिक ब्लू, कॉपर गोल्ड, पांढरा आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. आता राहिली गोष्ट ती किंमतीची तर जितेक जास्त फिचर तितकी त्याची किंमत असंच हे गणित आहे.

गॅलेक्सी एस-5 ची किंमत कंपनीने अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. पुढील महिन्यात 11 एप्रिल रोजी हा फोन बाजारात उपलब्ध होणार आहे. तेव्हाच फोनची किंमत जाहीर करणार असल्याचं सॅमसंगने स्पष्ट केलंय.

  • Manoj Pimpale

    sony is best z1………….

close