काँग्रेस-भाजपविरोधात तिसरी आघाडी रिंगणात

February 25, 2014 9:23 PM1 commentViews: 1202

Third-Front-Lef1507125 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता तिसरी आघाडी आकार घेऊ लागलीय. दिल्लीत आज बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी 11 पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यात जेडीयू, अण्णा द्रमुक, समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला. तर निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं नितीश कुमारांनी स्पष्ट केलं.

तिसर्‍या आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार, हे मात्र निवडणुकीनंतर ठरवू, असं सांगण्यात आलंय. दरम्यान, 11 पैकी 8 पक्षांचेच नेते आजच्या बैठकीला हजर होते. बिजू जनता दल आणि झारखंड विकास मोर्चाचे नेते मात्र हजर नव्हते. काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना बैठकीला उपस्थित रहाणं शक्य झालं नाही, अशी माहिती करात यांनी दिलीय.

तिसर्‍या आघाडीची ताकद

समाजवादी पक्ष – 20
अण्णा द्रमुक – 9
जेडीयू – 1
सीपीआय – 4
सीपीएम – 16
फॉरवर्ड ब्लॉक – 2
रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी – 2
बिजू जनता दल – 14
आसाम गण परिषद – 1
एकूण – 90

लोकसभेच्या 543 जागांपैकी किती मतदारसंघांमध्ये या तिसर्‍या आघाडीचा प्रभाव आहे ?

राज्य             मतदारसंघ

आसाम           14

बिहार             40

झारखंड           14

कर्नाटक           28

केरळ               20

ओडिशा           21

तामिळनाडू    39

त्रिपुरा             02

यूपी                80

उत्तराखंड         02

प.बंगाल         42

पुद्दुचेरी            01

एकूण – 306

म्हणजे लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एकूण 306जागांवर तिसरी आघाडी प्रभावी आहे.

  • Suraj Shah

    NAMO SHOULD NOW FORGET 272 AND PM POST

close