‘मला इच्छा मरण हवंय’

February 25, 2014 10:35 PM0 commentsViews: 1578

25 फेब्रुवारी : मरणासन्न परिस्थितीत इच्छामरणाला परवानगी द्यायची का, हा विषय सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे पाठवलाय. या संपूर्ण प्रकरणानंतर पुण्यातील विद्या केतकर यांच्याशी आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांनी संवाद साधलाय. आजारपणामुळे नव्हे, तर जीवन जगून पूर्ण झालंय, वृद्धापकाळामुळे मला मरण हवंय, अशी इच्छा विद्या केतकर यांनी व्यक्त केलीय. मरणासन्न परिस्थितीत, कोणतेही उपचार यशस्वी होण्याची शक्यता नसताना इच्छामरणाला परवानगी द्यायची का, यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 2011 सालच्या, काही प्रमाणात इच्छामरणाला परवानगी देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेत. सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवलाय. हा प्रश्न सामाजिक, कायदेशीर, वैद्यकीय आणि घटनात्मकरित्या महत्त्वाचा असल्यानं आम्ही याला घटनापीठाकडे पाठवत आहोत, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

close