मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू -राजनाथ सिंह

February 25, 2014 11:06 PM2 commentsViews: 2645

Image img_234592_rajnathsinginjalana_240x180.jpg25 फेब्रुवारी : निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिमांना खूश करण्यासाठी भाजपने माफीनामा सादर केलाय. भूतकाळात भाजपकडून काही चुका झाल्या असतील तर नतमस्तक होऊन आम्ही माफी मागायला तयार आहोत असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलंय.

दिल्लीत मुस्लीम संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. मुस्लिमांनी भाजपला एकदा संधी द्यावी आणि काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं. अल्पसंख्यांकाच्या मागासपणाला काँग्रेस जबाबदार आहे असं म्हणत राजनाथ सिंग यांनी गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिलीय.

अल्पसंख्यांकानी भाजपला एकदा संधी द्यावी, भाजप तुम्हाला नाराज करणार नाही. या अगोदर भाजपकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही नतमस्तक होऊन माफी मागायला तयार आहोत असं राजनाथ सिंग म्हणाले. राजनाथ सिंह यांनी माफी मागितल्यामुळे आता नरेंद्र मोदी गुजरात दंगली प्रकरणी मुस्लिमांची माफी मागणार का ? असा प्रश्न उपस्थित झालाय.

  • Suraj Shah

    U TURN OF THE CENTURY.

  • Suraj Shah

    MAKE MODI SAY SORRY NOT RAJNATH

close