सिंधुरत्न पाणबुडीला अपघात

February 26, 2014 11:43 AM0 commentsViews: 1772

sindhuratna26 फेब्रुवारी :  आयएनएस सिंधुरक्षकच्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आज पुन्हा एका पाणबुडीला अपघात झालाय. आयएनएस सिंधुरत्न या नौसेनेच्या पाणबुडीला मुंबईच्या नेव्हल डॉकजवळ अपघात झालाय. या घटनेत नेव्हीचे दोन अधिकारी बेपत्ता झालेत. तर 7 जण जखमी झालेत. त्यांना INS अश्विनी या नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सिंधुरत्नच्या ज्या कंपार्टमेंटमध्ये ही आग लागली त्याठिकाणी विषारी धूर पसरला. आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाहीय. सिंधुरत्नच्या मदतीसाठी आणखी एक जहाज पाठवण्यात आलंय.

मुंबईच्या किनार्‍यापासून 100 सागरी मैलांवर सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झालाय. पाणबुडीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्यानं अपघात झाल्याचं लक्षात आलं. या धुरामुळे 7 नौसैनिकांना त्रास व्हायला लागला. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलाय. जखमी जवानांना आयएनएस अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. दोन नौसेनिक अजूनही बेपत्ता आहेत. सिंधुरत्नच्या मदतीसाठी आणखी एक जहाज पाठवण्यात आलंय. तसंच वेस्टर्न नेव्हल कमांडकडून हेलिकॉप्टर आणि फास्ट ट्रॅक क्राफ्ट पाठवण्यात आलंय. ऑगस्ट 2013 मध्ये आयएनएस सिंधुरक्षकमध्ये स्फोट झाला होता. त्यात 18 जवान मृत्युमुखी पडले होते. ISN सिंधुघोषमध्येही अपघात झाला होता.

नौदलाच्या पाणबुड्यांना अपघात

- ऑगस्ट 2013 – सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात
– 18 जवानांचा मृत्यू
– सिंधुरक्षक – 1997 ला नौदलात दाखल
– कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच अपघात

- 26 फेब्रुवारी – INS सिंधुरत्न पाणबुडीला अपघात
– 8 जवान जखमी
– पाणबुडीच्या योग्य देखभालीचा अभाव
– INS सिंधुरत्न 1988 साली नौदलात दाखल
– INS ‘सिंधुरत्न’ ची 10 वर्षं सेवा बाकी

close