दलदलीत फसली हत्तीण

February 26, 2014 1:42 PM0 commentsViews: 283

26 फेब्रुवारी :   सिंधुदुर्गमध्ये एक जंगली हत्तीण एका शेतातल्या दलदलीमध्ये फसलीय. हिंदेवाडीतल्या शेतकर्‍यांना ही हत्तीण अशा अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी लगेच वन विभागाला कळवलं. फायरब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचे फवारे मारुन दलदल बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु झालेत. मात्र ही हत्तीण आजारी असण्याची शक्यता आहे, त्यामुळं तिला उठता येत नसल्याचं दिसून येतंय. परंतु, गेली अनेक वर्ष त्रस्त असलेल्या सिंधुदुर्गातल्या शेतकर्‍यांनी याठिकाणी हत्तींसाठी हत्तीग्राम करण्याची मागणी केली आहे.

close