पवार देणार नाराज काँग्रेस नेत्यांना संधी

March 11, 2009 7:13 AM0 commentsViews: 6

11 मार्च राष्ट्रवादीनं काँग्रेसला 50 – 50 चा पर्याय दिला होता. पण तो काँग्रेसला मान्य नाहीये. त्यामुळे काँग्रेसला दुबळं करण्याचा शरद पवारांचा नवा डाव आहे. ते काँग्रेसच्या नाराज नेत्यांना तिकीट देण्याची शक्कल लढवत आहेत. गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीनं दहा जागांच्या उमेदवारांबाबत चाचपणी केली. परभणीची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात असल्यानं शिवसेनेचे बंडखोर खासदार तुकाराम रेंगे पाटील पवारांना भेटले. रेंगे काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. नारायण राणेंचे मित्र आहेत. आपल्या उमेदवारीसाठी रेंगे पाटलांनी चाचपणी केली. सातारा आणि कोल्हापूर या दोन जागांची चर्चा झाली. सातार्‍यामधून उदयनराजे भोसले, तर कोल्हापूरमधून छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित झालंय. अहमदनगर जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते यशवंतराव गडाख यांनी पवारांची भेट घेतली. ते आणि त्यांचा मुलगा शंकरराव गडाख निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आणि पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर मावळच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.

close