बारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार कायम

February 26, 2014 4:11 PM0 commentsViews: 116

12th exam kolhapur26 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार आज (बुधवारी) सहाव्या दिवशीही कायम आहे. आज राज्यातल्या वेगवेगळ्या विभागीय मंडळामध्ये बोलावण्यात आलेल्या मॉडरेटर्सच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला.

सुरुवातीला चीफ मॉडरेटर्सच्या बैठकीला शिक्षक गैरहजर राहिले होते. त्यापाठोपाठ आता जोपर्यंत जी.आर निघत नाही तोपर्यंत मॉडरेटर्स बैठकीला गैरहजर राहतील अशी भूमिका शिक्षक संघटनेने घेतलीय. दरम्यान, मुख्याध्यापकांच्या संघटनेनं बहिष्कार मागे घेतला असल्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळांमध्ये पाठवायला सुरूवात झालीय.

मात्र त्यांच्याकडून शिक्षकांनी पेपर ताब्यात घ्यायला मात्र नकार दिलाय. लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल आणि निकाल वेळेवरच लागतील असं बोर्टाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितलंय.

close