रिलायन्स-टाटाकडून जनतेची फसवणूक, दमानियांची आगपाखड

February 26, 2014 4:43 PM3 commentsViews: 626

anjal damaniya 426 फेब्रुवारी : रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन्ही कंपन्या जनतेची फसवणूक करत आहे आणि एमईआरसी दोन्ही कंपन्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या सदस्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

तसंच विदर्भात वीजेची गरज असतानाही विदर्भातलीच वीज मुंबईला दिली जाते आणि यामुळे विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतायत असा आरोपही दमानिया यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन आरोपाच्या फैरी झाडल्यात.

काही दिवसांअगोदरच अंजली दमानिया यांनी ऊर्जा खात्यात 20 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीने अंजली दमानियांचे आरोप फेटाळून लावलेच होते पण महानिर्मितीने ‘आप’चे आरोप धांदट खोटे असल्याचं म्हटलं होतं. भांडवली गुंतवणुकीची गरज समजून न घेता दमानिया आरोप करत असून लोकांची दिशाभूल करत आहे असं पत्रकच महानिर्मितीने प्रसिद्ध केलं होतं.

  • aazaad hindustaani

    Modi BJP Gujrat exposed : Proof-1..

  • aazaad hindustaani

    एक गोष्ट मान्य करावी लागेल कि केजरीवाल खूप हुशार माणूस आहे आणि आपणा सर्वांसाठी लढतोय. जे संविधान आणि जी घटना जनतेसाठी लिहिली गेली तिची ह्या प्रतिष्ठित राजकारण्यांनी स्वताच्या फायद्यासाठी किती वाट लावली आहे हे तुम्हा आम्हाला श्रीमंत आणि गरिबा मधल्या फरकाने स्पष्ट दिसतंय. आता सामान्य माणूस जागा होतोय. आम्ही केजरीवालच्या मागे उभे आहोत. केजरीवाल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ही……

  • aazaad hindustaani

    केजरीवाल सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. भ्रष्टाचार्यांचे दुकान बंद करा…

close