कुणीही पंतप्रधान होवो पण पहाट झाली पाहिजे -नाना पाटेकर

February 26, 2014 6:37 PM6 commentsViews: 2605

nana patekar news26 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान झालं तरी चालेल पण पहाट झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काय करता हे महत्वाचे आहे असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

तसंच नाना पाटेकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. पण ही चर्चा चुकीची असून आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही, असंही नाना पाटेकर यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. निवडणूक लढवण्याची अजून आपली पात्रता नाही, ताकद नाहीय, माझा तो पिंड नाही. माझ्याकडे सशक्त चित्रपट, नाटकांचं माध्यम आहे त्यातून मी माझं काम करतोय त्यामुळे मला राजकारणात उतरण्याची गरज नाही असं नानांनी स्पष्ट केलं.

आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. कारण एका पक्षाची मिरासदारी घेतली तर दुसर्‍याबद्दल बोलण्याचा अधिकार आपण गमावून बसतो ते मला करायचं नाही. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमचं कौतुक आणि चुकला तर बोलण्याचा अधिकार आम्हाला द्यावा असंही नाना म्हणाले. नाना पाटेकर यांनी आम आदमी पार्टीला सल्लावजा टोलाही लगावला. अण्णा हजारे यांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. अण्णां वडिलधारी व्यक्तीमत्व असून कान धरण्याचा त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने निवडणूक लढवावी का ? अस जर कुणी विचारलं तर माझा त्याला नकार आहे. आम आदमी पार्टीनं केवळ चांगलं बोलू नये तर त्यांनी ते करुनही दाखवावं असंही नाना पाटेकर यांनी म्हटलंय.

 • Nandan Nandimath

  ha dusra ak ahe…nustech u turn maraiche ghadi ghadi la…are spasht bol na…ekda tari.. vidarbhachya shetkari atmahatyebaddal…pachim maharshtrachi dadagiri baramatichi tagegiri ujaniche pani .sakharecha bhav kapashicha bhav ..ek tari wakya bol..nusate lambun khel kiti pahicha..ekdatari chendu tak… There is no neutral ..either left or right..Take a position..

 • aazaad hindustaani

  नमोदास पूर्ण अंधबुद्धी झाले आहेत.अरे युवक कॉंग्रेस हा प्रकार अस्तीत्वात तरी आहे काय?तो फक्त नावापुरता आहे.मी व्यवस्थितपणे आपची मेंबरशिप घेतली आहे.तेही केजरीवाल मुख्यमंत्री बनण्याआधी.निवडणूक आयोगानुसार मला अधिकृतपणे आपचा प्रचार करायची परवानगी आहे.तुम्ही इथे भजाच प्रचार करता पण तुम्ही कुणी भाजपची मेंबरशिप घेतली आहे का?आप हा भ्रष्टाचार विरोधी पक्ष आहे,कॉंग्रेसभाजप विरोधी/साथी नाही..

 • aazaad hindustaani

  केजरीवाल सारखा नि पक्षपाती आणि जनसेवेने झपाटलेला माणूस आपण आजवर पाहिलेला नाही.त्याचा हा खटाटोप केवळ भ्रष्ट्राचार नाहीसा करण्यासाठी आहे.आपला त्यांना पूर्ण पाठींबा असून अशा माणसास शतश शुभेच्या.जन लोकपाल आलेच पाहिजे भ्रष्टाचार नाहीसा झालाच पाहिजे.

 • aazaad hindustaani

  केजरीवाल खरच प्रामाणिकपणे काम करत आहेत …मानल आपण… लोकपाल आल्यशिवाय काही सुधारणा होणार नाही …हे सगळ्यांना माहित आहे… तो माणूस त्याचा साठी पर्यंत करत आहे….पण काही लोकांना ते आवडत नाही…मुखय्मन्त्रि म्हणजे आदर्श घोटाळा अस काही तरी करणारा ..किवा लोकासाठी काहीच न करणारा असावा..उगाच जास्त कामे करू नयेत…असा हवा आहे….!!!!!!!!!!……

 • aazaad hindustaani

  एक गोष्ट मान्य करावी लागेल कि केजरीवाल खूप हुशार माणूस आहे आणि आपणा सर्वांसाठी लढतोय. जे संविधान आणि जी घटना जनतेसाठी लिहिली गेली तिची ह्या प्रतिष्ठित राजकारण्यांनी स्वताच्या फायद्यासाठी किती वाट लावली आहे हे तुम्हा आम्हाला श्रीमंत आणि गरिबा मधल्या फरकाने स्पष्ट दिसतंय. आता सामान्य माणूस जागा होतोय. आम्ही केजरीवालच्या मागे उभे आहोत. केजरीवाल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ही.`

 • aazaad hindustaani

  केजरीवाल सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. भ्रष्टाचार्यांचे दुकान बंद करा.`

close