सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

February 26, 2014 11:02 PM0 commentsViews: 452

Image img_233102_subroatroy_240x180.jpg26 फेब्रुवारी : सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. कोर्टात हजर न राहिल्याने सुप्रीम कोर्टाने हे वॉरंट काढलंय.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये परत न केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांच्याविरोधात खटला सुरू आहे.

आपल्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे आपल्याला कोर्टात हजर रहाण्यापासून सूट द्यावी, अशी याचिका मंगळवारी सुब्रतो रॉय यांनी कोर्टात दाखल केली होती. पण, कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

close