अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी

February 27, 2014 9:01 AM0 commentsViews: 383

27 फेब्रुवारी : अंबरनाथच्या 954 वर्षापूर्वीच्या अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांनी रात्री पासून लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथीय असून शिलाहार राजा मुंबानी याने 954 वर्षानपूर्वी ते बांधलय.

युनेस्कोने जाहीर केलेल्या भारतातील अतीप्राचीन पुरातन मंदिरांच्या यादीत या शिवमंदीराची नोंद आहे. महाशिवरात्री निमित्त याठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून लाखो भाविक अंबरनाथ शहरात येतात.महाशिवरात्रीच्या निमित्ताने अंबरनाथ शहरात मोठी यात्रा भरते.

आज मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास शिवलिंगाचा अभिषेक घालण्यात आला.यावेळी हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. अंबरनाथ नगरपालिकेने भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्थाही केली आहे.

close