राजीव गांधींच्या इतर चार मारेकर्‍यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

February 27, 2014 11:36 AM0 commentsViews: 281
rajiv gandhi27 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चार मारेकर्‍यांच्या सुटकेला आज (गुरूवार) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
 
यापूर्वी त्यांच्या तीन मारेकर्‍यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर इतर चार मारेकर्‍यांचा सुटकेचा तमिळनाडू सरकारने निर्णय घेतला होता. तमिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत सुटकेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. केंद्राच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने चार मारेकर्‍यांच्या सुटकेवर सहा मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

राजीव हत्येतील दोषी मुरुगन, संथन आणि पेरारिवलन यांच्या सुटकेला न्यायालयाने आधीच स्थगिती दिली होती, उर्वरित चार दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने मुरुगन, संथन आणि पेरारिवलन या तिघांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली होती. यावर घटनात्मक अधिकारांचा वापर करून तमिळनाडू सरकारने या हत्येतील सर्व सात दोषींची मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

close