आर्थिक मंदीत रंगाची उधळण जोरात

March 11, 2009 8:43 AM0 commentsViews: 2

11 मार्च, मुंबई ऋतुजा मोरेरंगपंचमीला आर्थिक मंदीची झळ जाणवत असूनही रंग लावणार्‍या आणि रंगणार्‍यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.सध्या संपूर्ण मार्केट कलरफूल झालं होतं. विविध रंग, फुगे आणि पिचकार्‍या यांची मार्केटमध्ये रेलचेल होती. घाऊक बाजारात इको- फ्रेंडली रंगांना जास्त मागणी होती. त्याची किंमत 150 रुपये किलो होती. किंमत जास्त असली तरी ग्राहकांचा सेलिब्रेशनचा मूड मात्र जबरदस्त होती.वस्तूंच्या किंमती वाढतातच. पण भारतीय सणांचं महत्त्वही आहेच. त्यामुळं सेलिब्रेशन मूड आहे. अशावेळी कोणी किंमतींकडे बघत नाही, असं ग्राहकांचं म्हणणं होतं.चायना खेळण्यांवरची बंदी उठली. आणि रंगपंचमीच्या निमित्तानं चायना पिचकार्‍यांनी मार्केट काबीज केलं होतं. निवडणुकांची रणधुमाळी पिचका-यांच्या बाजारात लक्षवेधी होती. आणि त्यांची किंमतही आवाक्यातल्या होत्या.मंदीचा फटका इथंही जाणवतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत विक्री वीस ते पंचवीस टक्क्यांनी घटलीये. पण तरीही बुरा न मानो होली है, असं म्हणत ग्राहकवर्गही मनसोक्त खरेदी करताना दिसले.

close